निवृत्तीनाथांच्या पादुका विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

विश्वस्त व पुजक ह.भ.प.सुरेश महाराज व जयंत महाराज गोसावी यांनी निवृत्तीनाथांचे अभंग म्हंटले. यावेळी या मंदिराचे विश्वस्त मंडळासह मोजके भाविक उपस्थित होते. समाधी मंदिरा बाहेर प्रस्थान प्रसंगी महिलांनी औक्षण केल्यावर पायी सगळे कुशावर्त तीर्थावर स्नानास टाळ मृदुंगाच्या नादात जयहरी घोषकरीत पोहचले.
 
पुणे : वीस लोकांच्या उपस्थितीत निवृत्तिनाथांचा जयघोष करीत शिवशाहीने पावणेदहा वाजता पंढरपुराकडे प्रस्थान केले. तत्पुर्वी समाधी मंदिरात समितीची नेहमीची पुजा संपन्न झाल्यावर पालखीतीलश्रींच्या चांदीच्या प्रतिमाव पादुकांची पुजा पुजक सच्चिदानंद गोसावी यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

विश्वस्त व पुजक ह.भ.प.सुरेश महाराज व जयंत महाराज गोसावी यांनी निवृत्तीनाथांचे अभंग म्हंटले. यावेळी या मंदिराचे विश्वस्त मंडळासह मोजके भाविक उपस्थित होते. समाधी मंदिरा बाहेर प्रस्थान प्रसंगी महिलांनी औक्षण केल्यावर पायी सगळे कुशावर्त तीर्थावर स्नानास टाळ मृदुंगाच्या नादात जयहरी घोषकरीत पोहचले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगाकर यांनी 'श्रीं'ची अभिषेक पुजा केली. यावेळी विश्वस्त पवन भुतडा, जिजाबाई लांडे, पंडीत महाराज कोल्हे, त्रंबकराव गायकवाड, संजय धोंगडे, मधुकर लांडे, त्रंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त प्रशांत गायधनी, पोलिस उपविभागीय अधिकारी भिमाशंकर ढोले, प्रांत चव्हाण, तहसिलदार दिपक गिरासे, नायर तहसिलदार राठोड, ललिता शिंदे, सहा.पोलिस निरीक्षक कर्पे, पुंडलिकराव थेटे, आमदार चारोस्कर या सह वारकरी उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कुशावर्ती पुजा झाल्यावर त्रंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजाला सर्वांनी नमस्कार केला. तेथे महिलांनी व वारकरी व आमदार यांनी फुगड्या खेळल्या यानंतर शिवशाही बसला भगवत ध्वजा लावल्यावर श्रीफळ वाढविण्यात आल्यावर श्रींची मुर्ती व पंढरपुरला जाणारे विराजमान झाल्यावर शिवशाही रवाना झाली. आजचा सोहळा दरवर्षी प्रमाणे नव्हता. सांयकाळी पंढरपुरात पोहचून निवृत्तिनाथ मठात त्यांचा मुक्काम राहिल.

पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती आणि नियोजनबद्ध धावपळ; वाचा तुम्हाला माहिती नसलेल्या सुप्रिया सुळे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty people leave with Nivruttinath Paduka For Pandharpur at 10am by Shivshahi