Ganesh Festival 2025 : मार्केट यार्डात शारदा गजाननाला पालेभाज्यांची आकर्षक आरास; २२ प्रकारच्या भाज्यांचा सहभाग

Market Yard Pune Vegetable Ganpati Decor : पुण्यातील मार्केट यार्ड येथील श्री शारदा गजानन मंदिरात २२ प्रकारच्या पालेभाज्यांनी बाप्पाला सजवून पर्यावरणपूरक आणि कृषिप्रधान गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
Market Yard Pune Vegetable Ganpati Decor
Market Yard Pune Vegetable Ganpati DecorSakal
Updated on

मार्केट यार्ड : येथील श्री शारदा गजाननाच्या मंदिरात मंगळवारी (ता. २) अनोखी आणि आकर्षक अशी पालेभाज्यांची आरास करण्यात आली होती. तब्बल २२ प्रकारच्या ताज्या व दर्जेदार भाज्यांनी बाप्पाला सजविण्यात आले होते. यामध्ये मेथी, कोथिंबीर, शेपू, करडई, चवळई, बीट, लाल माठ, लाल मुळा, पांढरा मुळा, अंबाडी, कांदापात, पुदिना, कढीपत्ता, चुका, चाकवत, लाल राजगिरा, गवती चहा आदी भाज्यांचा समावेश होता. हजारो गड्ड्यांची मांडणी करत केलेल्या या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com