एकाच रस्त्याचे दोनदा भूमीपूजन; स्मार्ट  सिटीच्या कामावरुन राजकीय श्रेय वाद

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

बाणेर-औंधला जोडणा-या रस्त्याचे प्रभाग क्रमांक आठ व नऊमध्ये दोनदा वेगवेगळे भूमीपूजन केल्याने राजकिय श्रेयवाद समोर आला आहे. स्मार्ट सिटीच्या वतीने बनवण्यात येत असलेल्या  बाणेर मधील शिंदे मळा, कपिल ट्रेंक्वील सोसायटी ते विधाते वस्ती रस्त्याचे भूमीपूजन ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी व भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत पार पडले होते.

औंध - बाणेर-औंधला जोडणा-या रस्त्याचे प्रभाग क्रमांक आठ व नऊमध्ये दोनदा वेगवेगळे भूमीपूजन केल्याने राजकिय श्रेयवाद समोर आला आहे. स्मार्ट सिटीच्या वतीने बनवण्यात येत असलेल्या  बाणेर मधील शिंदे मळा, कपिल ट्रेंक्वील सोसायटी ते विधाते वस्ती रस्त्याचे भूमीपूजन ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी व भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत पार पडले होते. यावेळी नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, भाजपचे पदाधिकारी प्रकाश बालवडकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. हे भूमीपूजन झाल्यानंतर काल प्रभाग आठच्या नगरसेविका व प्रभाग समिती अध्यक्षा अर्चना मुसळे यांनी पुन्हा एकदा याच रस्त्याचे भूमीपूजन केल्याने वादाला तोंड फुटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राष्ट्रवादीचे प्रभाग अध्यक्ष विशाल विधाते यांनी या भूमीपूजनास विरोध दर्शवला आहे."अगोदर भूमीपूजन झाल्यानंतर पुन्हा त्याच रस्त्याचे भूमीपूजन करण्याची गरज नसताना भूमीपूजन केल्याने केवळ श्रेय लाटण्याचा हा प्रयत्न" असल्याचे विधाते यांनी सांगितले. तर "आम्ही आमच्या प्रभागात भूमीपूजन केल्याने इतरांनी आक्षेप घेण्याचे काहीच कारण नसल्याचे" नगरसेविका अर्चना मुसळे यांनी सांगितले. यासंदर्भात स्मार्ट सिटीचे मुख्य अभियंता अरुण गोडबोले यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी दुरध्वनीवरुन  संपर्क साधला असता  त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twice Bhumipujan same road Political credit dispute