पुर्व हवेलीत शंभर बेडची दोन ग्रामीण रूग्णालये उभारणार : खासदार अमोल कोल्हे

जनार्दन दांडगे
Friday, 16 October 2020

पुर्व हवेलीत अत्याधनिक व सर्व सेवासुविधांनी परीपुर्ण असलेली शंभर बेडची दोन ग्रामीण रुग्णालये उभारणार असणार असल्याची घोषणा खासदार अमोल कोल्हे यांनी लोणी काळभोर य़ेथे केली.

लोणी काळभोर (पुणे) : भविष्य़काळात कोरोनासारख्या रोगाची साथ आल्यास नागरीकांची गैरसोय होऊ नये यासाठी, पुर्व हवेलीत अत्याधनिक व सर्व सेवासुविधांनी परीपुर्ण असलेली शंभर बेडची दोन ग्रामीण रुग्णालये उभारणार असणार असल्याची घोषणा खासदार अमोल कोल्हे यांनी लोणी काळभोर य़ेथे केली. ही रुग्णालये पुणे-सोलापुर महामार्गावर उरुळी कांचन अथवा लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत एक तर नगर रोडला एक अशी असणार आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मागील पंधऱा दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत असल्याचे दिसत असले तरी, दिवाळीनंतर थंडीच्या दिवसात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेकडून वर्तवली जात आहे. यामुळे नागरीकांनी यापुढील काळात गाफील न रहाता, कोरोनापासून स्वतःला व आपल्या कुटुंबाला दुर ठेवण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहनही खासदार कोल्हे यांनी यावेळी केले.

शिरुर येथील रावलक्ष्मी फाउंडेशनच्या वतीने शिरुर व हवेली तालुक्यात जिल्हा परीषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना १५ ऑक्सिजन मशिन भेट देण्यात येणार आहेत. याची सुरुवात खासदार कोल्हे यांच्या हस्ते लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन मशिन भेट देऊन, शुक्रवारी (ता. १६) करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना कोल्हे यांनी वरील आश्वासन दिले. 

सिगारेट ओढण्यास नकार दिल्याने जीवे मारण्याची धमकी; तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

यावेळी आमदार अशोक पवार, हवेली पंचायत समितीचे उपसभापती युगंधर काळभोर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, साधना बॅकेचे संचालक सुभाष काशिनाथ काळभोर, माजी उपसरपंच आण्णा काळभोर, राजाराम काळभोर, महाराष्ट्र केसरी राहूल काळभोर, राजलक्ष्मी फाउडेशनचे संस्थापक ॠषिराज पवार, लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डि. जे. जाधव व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार कोल्हे म्हणाले, ''उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवश्यक ती सर्व मदत केल्याने मागील काही दिवसात पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील कोरोनाचे रूग्ण कमी झाल्याचे आशायदायक चित्र दिसून येत आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. मात्र यापुढील काळात अशीच परीस्थिती राहिल अशी चिन्हे दिसत नाही. त्यातच जागतिक आरोग्य संघटनेने पुढील दोन महिण्यानंतर थंडीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो असा इशारा दिला आहे. सध्या नागरीकांनी मास्कचा वापर वाढविल्याने व योग्य ते अंतर ठेवल्याने कोरोना आटोक्यात आला ही बाब खरी आहे. मात्र यापुढील काळातही अशाच पध्दतीने पुढे जोण्याची गरज आहे.''

ते पुढे म्हणाले, मागील चार महिण्यांच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमानात असताना, नागरीकांना उपचारासाठी मोठ्या प्रमानात धावाधाव करावी लागली. अनेकांना बेड उपलब्ध न झाल्याने, उपचाराअभावी जिवही गमवावे लागले. ही परिस्थिती लक्षात घेऊन, पुढील काही महिण्यात पुणे-सोलापुर महामार्गावर उरुळी कांचन अथवा लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत एक तर नगर रोडला एक अशी दोन ग्रामीण रुग्णालये उभी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती करण्यात येणार आहे. आमदार अशोक पवार यांनी याबाबत लेखी मागणीही केलेली आहे. शिरुर लोकसभा मतदार संघातील नागरीकांना सर्वोच्च आरोग्य सुविधा मिळाव्यात हीच यामागची भावना आहे.'' 

Pune Rain : अनेकांसाठी ठरली रात्र वैऱ्याची; पाणी घरांत घुसल्याने नागरिकांना भरली धडकी

आमदार अशोक पवार म्हणाले, ''पुर्व हवेलीची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर अपघातात व्यक्ती मृत झाल्यास अथवा एखाद्याचा संशयास्पद मृत्यू झाल्यास, संबधित व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात न्यावा लागतो. तेथील रुग्णांची संख्या अधिक असल्याने, या भागातील नागरीकांना शवविच्छेदनासाठी ताटकळत बसावे लागते. यातून नातेवाईकांना होणारा मानसिक त्रास टाळण्यासाठी पुढील काही महिण्यात लोणी काळभोर शवविच्छेदन गृह उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.''

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two 100-bed rural hospitals to be set up in East Haveli says mp amol kolhe