esakal | धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत काढले फोटो; दोन आरोपींना अटक 
sakal

बोलून बातमी शोधा

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत काढले फोटो; दोन आरोपींना अटक 

या प्रकरणी सौरभ भगवान वाळूंज, आदित्य गुलाब कबाडी यांना अटक केली असून करण शिवाजी वाळूंज (सर्व राहणार तांबे, ता. जुन्नर) हा फरार झाला आहे.

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत काढले फोटो; दोन आरोपींना अटक 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आपटाळे : तांबे (ता. जुन्नर) येथील आदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तीन युवकांवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पॉक्सो) व अनुसूचित जाती जमाती अत्याचार या कलमान्वये तीन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पैकी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, एक आरोपी फरार आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांनी दिली. 

हे वाचा - 2021ला पृथ्वी होणार नष्ट; नॉस्ट्रेडॅमसची भविष्यवाणी ठरणार खरी?

या प्रकरणी सौरभ भगवान वाळूंज, आदित्य गुलाब कबाडी यांना अटक केली असून करण शिवाजी वाळूंज (सर्व राहणार तांबे, ता. जुन्नर) हा फरार झाला आहे. या घटनेची फिर्याद पीडित अल्पवयीन मुलीने सोमवार (ता. 28) रोजी जुन्नर पोलिस ठाण्यात दिली. या घटनेचे तीव्र पडसाद परिसरात उमटले आहेत.

उपविभागीय पोलिस अधिकारी जवळे म्हणाले, ''रविवार (ता. 20) रोजी पीडित अल्पवयीन मुलगी व तिच्या बहिणीची मुलगी या शिवणकामासाठी गावातील शिवणकाम करणाऱ्या दुकानात गेल्या होत्या. दुकानातून घरी परत येत असताना सौरभ वाळूंज व त्याचा मित्र करण यांनी त्यांचा पाठलाग केला. बैलगाडा घाटाच्या वरच्या बाजूला ज्वारीच्या मळ्याजवळ या दोघांनी पीडित मुलीला ओढून शेतात नेले. त्या नंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला.

पीडित मुलीचे फोटो काढून या घटनेबाबत कुणाला सांगितले तर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. भीतीपोटी पीडित मुलीने या घटनेबाबत कुणालाही सांगितले नाही. घटनेनंतर दोन्ही युवक त्यांचा मित्र आदित्य गुलाब कबाडी याच्या गाडीवर बसून पळून गेले. मात्र या घटनेबाबत मुलीच्या आईला समजल्यानंतर मुलीकडे विचारपूस केली असता फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्यामुळे याबाबत सांगितले नसल्याचे पीडित मुलीने आईला सांगितले. 

हे वाचा - 2021ला पृथ्वी होणार नष्ट; नॉस्ट्रेडॅमसची भविष्यवाणी ठरणार खरी?

पोलिस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे व पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन दोन आरोपींना अटक केली. फरार अरोपीचा शोध सुरू असून त्याला लवकरच अटक केली जाईल.अशी माहिती पोलीस निरीक्षक जाधव यांनी दिली.  

 (संपादन : सागर डी. शेलार)
 

loading image
go to top