
पुणे - पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदाच्या तीन जागा आहेत, पण गेल्या नऊ महिन्यापासून यातील दोन जागा रिक्त असल्याने प्रशासनाचे काम कोलमडले आहे. खुद्द आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना एका अतिरिक्त आयुक्ताकडच्या खात्यांचा कारभार सांभाळावा लागत आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता उठली असली तरीही राज्य शासनाने अतिरिक्त आयुक्त दिलेले नाहीत.