कुत्र्यांच्या नसबंदीसाठी पुणे शहरात दोन एजन्सी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, याबाबत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही नगरसेवकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जातात. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या अडीच लाखांच्या जवळपास आहे. त्यात पालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांचाही समावेश आहे. सध्या तीन एजन्सी पुणे शहरात कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत हे काम सुरू असून, आणखी दोन एजन्सींची नियुक्ती करून हे काम वेगात करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

पुणे - शहरातील मोकाट कुत्र्यांचा उपद्रव कमी करण्याकरिता आणि त्यांची नसबंदी करण्यासाठी आणखी दोन एजन्सी नियुक्त करण्याचा निर्णय पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, याबाबत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही नगरसेवकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जातात. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या अडीच लाखांच्या जवळपास आहे. त्यात पालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांचाही समावेश आहे. सध्या तीन एजन्सी पुणे शहरात कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत हे काम सुरू असून, आणखी दोन एजन्सींची नियुक्ती करून हे काम वेगात करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानुसार युनिर्व्हसल ॲनिमल वेल्फेअर बोर्ड व जेनीस वेल्फेअर ॲनिमल ट्रस्ट या दोन संस्थांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. 

भारताचे 4 अवकाशवीर प्रशिक्षणासाठी रशियाला रवाना

सध्या ‘द ॲनिमल राइट्‌स फंड’ ही संस्था कोथरूड भागात काम करीत आहे; तर हडपसर, माळवाडी येथे ‘ॲनिमल प्रोटेक्‍शन क्‍लब’ काम करीत आहे. नायडू रुग्णालय येथे ‘सोसायटी फॉर प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल’ ही संस्था कार्यरत आहे. नव्याने नियुक्त केलेल्या दोन संस्थांच्या केंद्रांमुळे नसबंदीची क्षमता ही ३५० पर्यंत वाढणार आहे. दर महिन्याला दोन हजार कुत्र्यांची नसबंदी केली जात आहे. नव्याने दोन एजन्सी वाढविल्याने ही संख्या आणखी वाढण्यास मदत होईल. या एजन्सीला प्रतिकुत्र्यामागे सोळाशे रुपये दिले जाणार आहे. हे दर ॲनिमल वेल्फेअर बोर्डाने ठरविल्यानुसार निश्‍चित केले गेले आहेत. प्रत्येक एजन्सीने प्रत्येक महिन्याला एक हजार कुत्र्यांची नसबंदी करावी, अशी अटही घातली आहे. ॲनिमल बर्थ कंट्रोल कायद्यानुसार महापालिका कुत्र्यांना पकडते. त्यांची नसबंदी करून पुन्हा त्यांना पकडलेल्या ठिकाणी नेऊन सोडते, असेही महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two agencies for dog sterilization in pune city