अडीच टन गोमांसाचे वाहन पकडले; सासवड पोलीसांकडून दोघांना अटक

Crime
Crime

सासवड - गोमांस वाहतूक करणाऱ्या दोघांना फलटणहून पुण्याकडे जाताना सासवड येथे पोलिसांनी आज सकाळी पकडले. त्यांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे ६ ते ९ गायीचे गोमांस व टेम्पो जप्त केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याप्रकरणी सचिन गायकवाड (रा. कोंढवा) आणि आकाश महेश लगे (रा. महंमदवाडी हडपसर) यांना सासवड पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी : झेंडेवाडी (ता.पुरंदर) गावचे गोरक्षक दीपक गोरगल यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सकाळी साडेसहा वाजता सासवड - जेजुरी मार्गावरील वीरफाटा येथे संशय आल्याने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुरंदर विभाग आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेचे गोरक्षक दीपक गोरगल, अमित पवार, सुरज भगत, प्रशांत रेवडीकर, विशाल पोरे आणि धनंजय मेमाणे यांनी टेम्पो ( एमएच १२ जीटी ७४५१ ) तपासणी केली. यामधे दोन ते अडीच टन गोमांस आढळून आले.

गोरक्षकांनी सदर टेंपो सासवड पोलीस ठाण्यात नेला. पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप व इतर पोलिसांनी तपासणी व चौकशी केली असता; त्यात गोमांस आढळले. सासवड पोलीसांनी महाराष्ट्र पशुसंवर्धन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून संशयित आरोपींना अटक केली. त्यांकडील गोमांस व टेम्पो जप्त केला आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com