कोरोनाची दुसरी लाट आल्यास प्रशासनाची तयारी : सौरभ राव

saurabh-rao
saurabh-rao

पुणे - जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या मृत्यूदरात आणि बाधितांच्या संख्येतही घट होत आहे. परंतु जगातील पश्‍चिमी देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू असून, भविष्यात जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यास उपाययोजना करण्याबाबत टास्क फोर्सच्या मदतीने तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार आणि श्रावण हर्डीकर या वेळी उपस्थित होते. विभागीय आयुक्‍त राव म्हणाले, "माझे कुटुंब माझी जबाबदारी' अभियान राज्यात सर्वाधिक प्रभावीपणे पुणे जिल्ह्यात राबविण्यात आले आहे. हे अभियान योग्य पद्धतीने राबविल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. पुणे जिल्ह्यात मृत्यूदर खाली येत आहे. हा दर पाच आठवड्यापूर्वी 554 वरून या आठवड्यात 205 वर आला आहे. कोरोनाचा पॉझिटिव्ह दरही 17 टक्‍क्‍यांवरून 15 टक्‍क्‍यांवर आला आहे. 

पुणे विभागातील उर्वरित चार जिल्ह्यांतही कोरोना बाधितांचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु भविष्यात गरज पडल्यास ऑक्‍सिजन बेड्‌स, औषधांची उपलब्धता याबाबत नियोजन करण्यात आले आहे. तसेच, पुन्हा खासगी रुग्णालये ताब्यात घेण्यात येतील. दुसरी लाट रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगवर भर देण्यात येणार आहे.

अकरावीच्या ऑनलाइन वर्गातून एचएसव्हीसी अभ्यासक्रमाला डावलले 

खासगी रुग्णालयातील बेड्‌स रिलीज करणार : 
पुणे शहरासह जिल्ह्यात मार्गदर्शक तत्त्वानुसार आठ हजार रुग्णांवर उपचार करण्याची बेड्‌स क्षमता असणे अपेक्षित आहे. खासगी रुग्णालयातील बेड्‌स टप्प्याटपने रिलीज करण्यात येत आहेत. जिल्ह्यात 23 कोविड केअर सेंटर होते. त्यापैकी रुग्ण नसल्यामुळे 18 कोविड केअर सेंटर तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या खासगी रुग्णालयातील ऑक्‍सिजनविरहीत एक हजार 800 बेड्‌स रिलीज करण्यात आले आहेत. सुपर स्पेशालिटी रुग्णालयांनाही कोरोना व्यतिरिक्‍त इतर रुग्ण दाखल करण्यास मुभा देण्यात आली आहे. रुबी आणि दीनानाथ अशा मोठ्या रुग्णालयांतील कोरोनाचे आरक्षित बेड्‌स कमी करण्यात येतील. परंतु वेळप्रसंगी कोरोना रुग्णासाठी बेड्‌स वाढविण्यात येतील या अटीवर ही परवानगी देण्यात येईल.

काय सांगता ! पुण्यातील `या` भागात चक्क नगरसेवकांकडून बेकायदा वीज जोडणी 

कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी सरकारी रुणालयांची क्षमता आहे. परंतु खासगी रुग्णालयांनी त्यांच्या गरजेनुसार कोरोना बाधित रुग्ण ठेवावेत. जम्बोसह अन्य सरकारी रुग्णालयातील कंत्राटी पद्धतीवर घेण्यात आलेले डॉक्‍टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येणार नाही, असे विभागीय आयुक्‍त राव यांनी स्पष्ट केले.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com