पैशांचा पाऊस पाडणारे कासव?, बारामतीत कासव तस्करी़प्रकरणी दोघेजण ताब्यात

कल्याण पाचांगणे
Thursday, 22 October 2020

बारामती तालुका पोलिसांनी आज कासव तस्करी प्रकरणी दोन व्यक्तींना ताब्यात घेतल्याची माहिती पुढे आली आहे. 

माळेगाव : बारामती तालुका पोलिसांनी आज कासव तस्करी प्रकरणी दोन व्यक्तींना ताब्यात घेतल्याची माहिती पुढे आली आहे. मुद्देमालासह राजू सजन गायकवाड (वय 22), विजय अरुण गायकवाड( वय 21, दोघे रा. आमराई बारामती) यांना ताब्यात घेतले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, गुरूवारी पहाटे तीनच्या सुमारास वंजारवाडी (ता. बारामती) हद्दीमध्ये वरील दोन अनोळखी व्यक्ती रिक्षातून संशयितरित्या फिरत आहेत, अशी माहिती येथील ग्रामसुरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांना दिली. त्यानुसार राजू गायकवाड व विजय गायकवाड यांना पकडणे सोपे झाल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संबंधितांकडे पोलिसांनी प्रथमदर्शनी तपास केला असता सदरचे कासव विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले. कासवापासून पैशाचा पाऊस पडतो अशी अंधश्रद्धा हे लाेक पसरवतात. त्यामुळे कासवांची लाखो रुपयांना तस्करी होते. याच हेतूने संबंधितांनी कासव जवळ बाळगले, तसेच त्याची विक्री करण्याचा प्रय़त्न केला, अशी माहीती पोलिसांनी दिली.

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरम्यान, याप्रकरणी भारतीय वन्य अधिनियमानुसार गुन्हा केल्याने संबंधित राजू व विजय यांच्यासह एक कासव व रिक्षा (क्रमांक एमएचबी 2054) अधिक चौकशीसाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती  साहय्यक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे, प्रमोद पोरे यांनी दिली. 

 (संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two arrested in Baramati turtle smuggling case