esakal | पुणे : लष्कर भरतीच्या परीक्षेत पास करण्याचे आमिष दाखवले अन् दोघे अडकले
sakal

बोलून बातमी शोधा

Indian_Army

वानवडी येथील 'एआयपीटी' या संस्थेत रविवारी सैन्य भरतीसाठीची लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला बसणाऱ्या काही तरुणांना परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जात असल्याची खबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांना प्राप्त झाली होती.

पुणे : लष्कर भरतीच्या परीक्षेत पास करण्याचे आमिष दाखवले अन् दोघे अडकले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : वानवडी येथील लष्करी प्रशिक्षण संस्था (एआयपीटी) येथे झालेल्या लष्करातील भरतीच्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे आमिष दाखवून तरुणांकडून लाखो रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या सहकार्याने टोळीला अटक केली आहे. त्यामध्ये लष्कराच्या भरती कार्यालयातील कर्मचाऱ्याचाही सहभाग आहे.

वेनसिंग लालासिंग रावत (वय 45, रा. पिंपळे वस्ती, मुंढवा, मूळ रा. अजमेर, राजस्थान), रवींद्र राठोड (रा. राजस्थान) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तर जयदेव सिंह परिहार हा लष्करी भरती कार्यालयातील कर्मचारी आहे. याप्रकरणी अक्षय साळुंखे या तरुणाने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण दुर्गमच; सॅटेलाईट योजनेकडे महाविद्यालयांनी फिरवली पाठ!​

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी येथील 'एआयपीटी' या संस्थेत रविवारी सैन्य भरतीसाठीची लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला बसणाऱ्या काही तरुणांना परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जात असल्याची खबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार, गुन्हे शाखेचे युनिट दोन आणि युनिट पाच अशी दोन पथके आणि लष्करी गुप्तचर विभागाचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी संयुक्त कारवाई करून शनिवारी रात्री रावत आणि राठोड यांना ताब्यात घेतले. लष्करी गुप्तचर विभाग आणि पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे विचारपूस केली, त्यावेळी त्यांनी रविवारी होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी 19 मुलांशी संपर्क साधला होता. रावत याने 'लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपली ओळख असून मी तुम्हाला लेखी परीक्षेत उत्तीर्ण करतो', असे तरुणांना सांगितले होते. तसेच काम झाल्यानंतर त्याने प्रत्येकी एक ते दोन लाख रुपयांची तरुणांकडे मागणी केली होती. त्यासाठी त्याने तरुणांकडून त्यांची मूळ कागदपत्रे ताब्यात घेतली होती.

फिटनेस प्रेमी अजूनही धास्तावलेलेच; जिमचालक आणि नागरिक म्हणतात...​

संबंधित 19 मुलांना पंधरा दिवसांपासून लोहगाव येथे एकत्र आणून एका शिक्षकाची नेमणूक करून त्यांचे वर्ग घेतले जात होते. स्वतःच्या बुद्धिमत्तेवर आणि क्षमतेवर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांकडूनच 'मी तुम्हाला लेखी परीक्षेत उत्तीर्ण केले,' असे सांगून निवड झालेल्या तरुणांना ठरलेली रक्कम दिल्यानंतरच त्यांची मूळ कागदपत्रे परत करण्याची धमकी रावत याने दिली होती. दरम्यान, या सर्व प्रकरणामध्ये संबंधित तरुणांना भरती व्हायचे असेल, तर रावतशी संपर्क साधा, असे लष्करी भरती कार्यालयातील लिपिक हवालदार जयदेव सिंह परिहार यानेच सांगितल्याचे तसेच त्यामध्ये त्याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिली.

संजय राऊत हे जगभरातील १८२ देशांचे प्रमुख; चंद्रकांत पाटील यांनी लगावला टोला

लष्करी भरती कार्यालयाकडून भरतीसाठी रविवारी एक नोव्हेंबर रोजी हडपसर येथील 'एआयपीटी'च्या आवारात 'एकत्रित प्रवेश परीक्षा' (सीईई) ठेवण्यात आली होती. त्यामध्ये जनरल ड्युटी, ट्रेड्‌समेन (व्यापार) आणि तांत्रिक विभागासाठी ही परीक्षा घेतली जात होती. परिक्षेसाठी पुणे, लातूर, बीड, नगर आणि उस्मानाबाद या पाच जिल्ह्यातील दोन हजार 200 उमेदवारांचा सहभाग होता. उमेदवारांनी सैन्य भरती प्रक्रियेसाठीची शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय परीक्षा हे पहिले दोन टप्पे यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर त्यांची 'सीईई'साठी निवड झाली होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)