mobile thief arrested
sakal
पुणे - गणपती विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीत भाविकांचे मोबाईल चोरून पसार होणाऱ्या मालेगाव (जि. नाशिक) मधील दोन चोरट्यांना फरासखाना पोलिसांनी शिताफीने गजाआड केले. या कारवाईत पोलिसांनी १३ महागडे मोबाईल जप्त करून सुमारे एक लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.