अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या दोघांना अटक; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

रवींद्र पाटे
Monday, 26 October 2020

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवुन नेल्या प्रकरणी दोन जणांना अटक केली असून आरोपींवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कलमा अन्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नारायणगाव : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी दोन जणांना अटक केली असून, आरोपींवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कलमान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक डी. के. गुंड यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या प्रकरणी तुषार प्रभाकर जाधव ( वय१९), साईप्रसाद हनुमंत देवाडे (वय १९, दोघेही राहणार नारायणगाव, ता. जुन्नर ) यांना अटक केली असून, आरोपींची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे, अशी माहिती गुंड यांनी दिली. 

आरोपींनी सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते. या बाबतची तक्रार २२ ऑक्टोबर२०२० रोजी नारायणगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. आरोपी जाधवचे नातेवाईक श्रीरामपूर येथे रहात असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती. त्या नुसार तपास केला असता आरोपी मुलीसह श्रीरामपूर येथे आढळून आला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाच ते दहा वर्षा पर्यंत शिक्षेची तरतूद : गुंड म्हणाले अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे प्रकार वाढत आहेत. अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणे, पाठलाग करणे, विनयभंग करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. या मध्ये भा. द. वि. कलम ३५४ (अ) (ड) सह कलम ८,१२ पोक्सो कायदया अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल केला जातो. या गुन्ह्यात आरोपीला पाच ते दहा वर्षे शिक्षा होऊ शकते.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two arrested for kidnapping minor girl