Otur Crime : बनावट कागदपत्रांचा वापर करून ओतूरमध्ये वास्तव्य; दोन बांगलादेशी नागरिकांना एटीएसने घेतले ताब्यात
बनावट कागदपत्रांचा वापर करून पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे बेकायदा वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतले.
पुणे/ओतूर - बनावट कागदपत्रांचा वापर करून पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे बेकायदा वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतले. बुधवारी रात्री कारवाई करून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.