esakal | विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या 'त्या' दोन बाऊन्सरना अटक

बोलून बातमी शोधा

crime

27 फेब्रुवारीला रात्री फिर्यादी प्रतिक व त्याचे मित्र बाणेर रस्त्यावरील ठिकाणा रेस्टो ऍन्ड बार येथे निरोप समारंभानिमित्त पार्टी करण्यासाठी एकत्र आले होते.

विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या 'त्या' दोन बाऊन्सरना अटक
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे :  बाणेर येथील हॉटेलमध्ये पार्टी केल्यानंतर किरकोळ कारणावरून विद्यार्थ्यांना जबर मारहाण करुन जखमी करणाऱ्या हॉटेलच्या दोन बाऊन्सरला गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाने अटक केली. यापूर्वी चतुःश्रृंगी पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कुणाल मृगनाथ ठोंबरे (वय 21, रा. चाळ क्रमांक 3, म्हातोबानगर, कोथरुड), योगेश विष्णू चव्हाण (वय 30, रा. नवले पुलाजवळ, वडगाव धायरी) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रतिक उत्तम कदम (वय 20, रा. गोखलेनगर) यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल दिली होती.

- Nirbhaya Case : अखेर निर्भयाचे दोषी फासावर लटकणार, आता 'ही' तारीख!

27 फेब्रुवारीला रात्री फिर्यादी प्रतिक व त्याचे मित्र बाणेर रस्त्यावरील ठिकाणा रेस्टो ऍन्ड बार येथे निरोप समारंभानिमित्त पार्टी करण्यासाठी एकत्र आले होते. मध्यरात्री हॉटेलमधील गाणी बंद केल्यामुळे संबंधीत विद्यार्थ्यांनी ती पुन्हा सुरू करण्याची हॉटेल कर्मचाऱ्याकडे मागणी केली होती. त्यावेळी हॉटेलमधील कर्मचारी व विद्यार्थ्यांची भांडणे झाली होती.

- कोरोना संदर्भात ओबामांचा अनोखा सल्ला; पाहा काय म्हणाले!

त्यानंतर हॉटेलच्या व्यवस्थापकाने बाऊन्सरला बोलावून विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली. त्यामध्ये फिर्यादी प्रतिक कदम यास गंभीर दुखापत झाली होती. संबंधीत गुन्ह्यासंदर्भातचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यानंतर पोलिस कर्मचारी विशाल शिर्के यांनी संबंधित गुन्ह्यात योगेश मानकर यांच्या एम सिक्‍युरीटीचे बाऊन्सर असल्याचे निदर्शनास आले.

- हिंदू-मुस्लिम एकतेवरील रितेश देशमुखचा 'तो' व्हिडिओ व्हायरल...

त्यानुसार, पोलिसांनी ठोंबरे व चव्हाण या दोघांना अटक केली. पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, पोलिस उपनिरीक्षक विजय झंजाड, शंकर पाटील, दत्तात्रय फुलसुंदर व शिर्के यांच्या पथकाने ही कारवाई केली.