पुणे शहरातील 'ते' दोन पुल...पाडण्याची प्रक्रिया...अन् अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 May 2020

गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाणपूल हे एमएसआरडीसीकडून 2006 बांधण्यात आले आहेत. या पुलाच्या उद्‌घाटनप्रसंगी नियोजन चुकले असल्याची कबुली देण्यात आली होती.

पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी गणेशखिंड रस्त्यावरील विद्यापीठ चौक आणि ई स्क्वेअर चौक येथील उड्डाणपूल पाडण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) राज्य सरकारच्या नगर विकास विभागाकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. हे दोन्ही पूल पाडण्यास, तसेच गणेशखिंड रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल उभारण्यास मान्यता देण्याची शिफारस या प्रस्तावात करण्यात आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे. संपूर्ण मेट्रो मार्ग हा इलेव्हेटेड असणार आहे. हे काम बीओटी तत्त्वावर टाटा- सिमेन्स या कंपनीला देण्यात आल्या आहेत. या कंपनीकडून या प्रकल्पाचा सर्वंकष प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे.

पीएमआरडीएने हाती घेतलेली मेट्रो पुणे महापालिकेच्या हद्दीत पुणे विद्यापीठ चौकातून गणेशखिंड रस्त्याने जाते. या मार्गावर असलेले तिन्ही उड्डाणपूल हे अडचणीचे ठरत आहे. हे उड्डाणपूल न पाडता मेट्रो मार्गात बदल केला, तर शासकीय आणि खासगी जागा ताब्यात घ्याव्या लागत आहे. त्यातून प्रकल्पाचा खर्च देखील वाढू शकतो. त्याऐवजी हे उड्डाणपूल पाडावेत, असा विचार पुढे आला होता. 

तीन महिन्यांपूर्वी गणेशखिंड रस्त्यावरील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या नवीन कार्यालयाचे उद्‌घाटन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्या कार्यक्रमात गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाणपूल पाडण्यासंदर्भात पवार वक्तव्य केले होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान मागील महिन्यात कोविड-19 च्या आढावा घेण्यासाठी पवार पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. त्यामध्ये गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाणपूल पाडण्यासंदर्भातील सूचना केल्या होत्या. 

यासंदर्भात पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार म्हणाले,"" विद्यापीठ आणि ई- स्क्वेअर चौकातील उड्डाणपूल पाडण्यासंदर्भात पालकमंत्री अजित पवार यांच्याबरोबर नुकतीच बैठक झाली. त्यांनी त्यास मान्यता देऊन तसा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार प्रस्ताव तयार करून राज्य सरकारच्या नगर विकास विभागाकडे पाठविण्यात आला आहे.'' 

खबरदार! 'या' भागातील कर्मचाऱ्यांना कामावर बोलवाल तर...

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या शहरात लॉकडाऊन आहे. सर्वत्र संचारबंदी आहे. या काळात पूल पाडण्यास कोणतीही अडचण येऊ शकत नाही. तसेच वाहतुकीला देखील अडथळा होऊ शकत नाही. त्यामुळे या कालावधीतच हा पूल पाडण्याचे नियोजन आहे. तसेही त्यांना कळविले आहे. राज्य सरकारकडून निर्णय आल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले. 

गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाणपूल हे एमएसआरडीसीकडून 2006 बांधण्यात आले आहेत. या पुलाच्या उद्‌घाटनप्रसंगी नियोजन चुकले असल्याची कबुली देण्यात आली होती. एकेरी ऐवजी दुहेरी वाहतुकीसाठी ते उभारणे आवश्‍यक होते, असे तज्ञांचे म्हणणे होते. ही चूक आता मेट्रो प्रकल्पाच्या निमित्ताने सुधारण्यात येणार आहे. 

Video : पिंपरी-चिंचवडकरांसाठी दिलासादायक; अपघातांचं प्रमाण घटलंय एवढं...

पुलाच्या ठिकाणी दुहेरी उड्डाणपूल 
हे दोन पूल पाडून त्या ठिकाणी दुहेरी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पाडण्यासाठी आणि त्या ठिकाणी नवीन दुमजली उड्डाणपूल उभारण्यासाठीचा खर्च पीएमआरडीए करणार आहे. त्यापैकी एका पूल हा फक्त मेट्रो प्रकल्पासाठी असणार आहे. तर दुसऱ्या पुलावरून बीआरटी आणि अन्य खासगी वाहनांसाठी त्यांचा वापर होणार आहे. तर त्या खालील रस्त्यावरून अन्य वाहनांची करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two bridges in Pune will be demolished soon