esakal | हृदयद्रावक घटना : लहान भावाच्या मृत्यूचा धक्का मोठ्याला सहन झाला नाही अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

death.jpg

कळंब (ता. इंदापूर) येथे लहान भावाचा मृत्यू झालेला धक्का मोठ्या भावाला सहन न झाल्याने मोठ्या भावाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

हृदयद्रावक घटना : लहान भावाच्या मृत्यूचा धक्का मोठ्याला सहन झाला नाही अन्...

sakal_logo
By
राजकुमार थोरात

वालचंदनगर : कळंब (ता. इंदापूर) येथे लहान भावाचा मृत्यू झालेला धक्का मोठ्या भावाला सहन न झाल्याने मोठ्या भावाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दोन सख्या भावांच्या मृत्यूमुळे वालचंनगर, कळंब परीसरराव शोककळा पसरली.
या घटनेमध्ये यशराज नवनाथ कडाळे ( वय १५) व यशवंत नवनाथ कडाळे (वय १३) या दोन सख्या भावांचा दुर्देवी मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार वालचंदनगर (ता. इंदापूर) मधील यशराज व यशवंत कडाळे दोघे भाऊ कळंब गावच्या हद्दीतील भोरकरवाडीमध्ये मामाच्या घरी आईसोबत राहत होते. आज सकाळी सातच्या सुमारास लहान भाऊ यशवंत कडाळे याला अचानक चक्कर आल्याने बाथरुमजवळ बेशुद्ध पडला. त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. लहान भाऊ बेशुद्ध झाल्याने मोठा यशराज तातडीने लहान भावाजवळ आल्यानंतर तोही बेशुद्ध झाला. लहान भावाचा झालेल्या मृत्यूचा धक्का मोठ्या भावाला सहन न झाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दोघांना वालचंदनगरमधील खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यापूर्वी दोघांचा मृत्यू झाला होता.  बारामतीमधील सिल्वहर ज्युबली हॉस्पिटलमध्ये दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, बारामती शहर पोलिस ठाण्यात दोन्ही भावांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दोन भावांच्या मृत्यूमुळे कळंब,वालचंदनगर परीसरावरती शोककळा पसरली आहे. मुलांचे वडिल नोकरीनिमित्त परदेशामध्ये आहेत.

काँग्रेसला बसणार मोठा धक्का? २२ आमदार दिल्लीत 

अनुवंशिक आजारामुळे दोघांचा मृत्यू...यांसदर्भात वैद्यकीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार दोघांना अनुवंशिक हद् याचा आजार असण्याची शक्यता असून, यामुळे दोघांचा एकाचवेळी मृत्यू झाला असल्याचे सांगितले.