धक्कादायक : शेततळ्यात बुडून दोन भावांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

वडापुरी (ता. इंदापूर) येथील आविष्कार (देव) किशोर शिर्के (वय 9) व अधिराज (ध्रुव) किशोर शिर्के (वय 7) या दोन सख्ख्या भावांचा गुरुवारी शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. 

वडापुरी (पुणे) : वडापुरी (ता. इंदापूर) येथील आविष्कार (देव) किशोर शिर्के (वय 9) व अधिराज (ध्रुव) किशोर शिर्के (वय 7) या दोन सख्ख्या भावांचा गुरुवारी शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. 

अजित पवार पुन्हा कडाडले, 'हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही'

वडापुरीजवळच शिर्केवस्ती येथे किशोर शिर्के कुटुंबीयासह राहतात. घराजवळ त्यांच्या शेतातच काही अंतरावर शेततळे आहे. गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास अविष्कार, अधिराज व त्यांचा चुलतभाऊ नाथ हे तिघे नेहमीप्रमाणे खेळायला गेले. खेळता खेळता ते शेततळ्याकडे गेले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अविष्कार व अधिराज शेततळ्यातील पाण्यात पडले. त्यांच्याबरोबर असलेला नाथ प्रल्हाद शिर्के (वय 9) याने घाबरलेल्या अवस्थेत घरी पळत जाऊन दोघे पाण्यात पडल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी शेततळ्यकडे धाव घेतली. मुलांना पाण्यातून बाहेर काढले. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. किशोर व शितल शिर्के या दांपत्यास ही दोनच मुले होती. बैलपोळ्या दिवशीच दोन्ही मुलांवर काळाने घाला घातला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two brothers drown in farm pond