पायथ्याशी दोन चार्जिंग स्टेशन; दिवसभरात १५० फेऱ्यांची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PMPML Bus

पायथ्याशी दोन चार्जिंग स्टेशन; दिवसभरात १५० फेऱ्यांची शक्यता

पुणे : पीएमपी व वन विभागाने सुरू केलेल्या सिंहगड किल्ले दर्शन ई बस सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद लाभत आहे. आठवड्यातील अन्य दिवशी १० बसेसच्या माध्यमातून १०२ फेऱ्या होत आहेत. सुट्ट्यांच्या दिवशी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता पीएमपी प्रशासनाने शनिवारी व रविवारी १५ बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. यामुळे जवळपास १५० फेऱ्या होण्याची शक्यता आहे.पीएमपीने गडावर आणखी एक व पायथ्याला दोन चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला. येत्या दहा ते पंधरा दिवसांत चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचा प्रयत्न असणार आहे.

पीएमपी ने१ मे पासून सिंहगडावर जाण्यासाठी ई बस सेवा सुरू केली असून त्याला पहिल्या दिवसांपासून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असल्यानेच बस व फेऱ्यांच्या संख्येत वाढ केली जाणार आहे. त्यावेळी एका चार्जिंग स्टेशनवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासन गडावर सध्या एक चार्जिंग स्टेशन आहे त्यात आणखी एकाने वाढ करणार आहे. पीएमपीने तसे पत्र ओलेक्ट्रा कंपनीला दिले आहे. येत्या शनिवार व रविवारपासून बसच्या संख्येत वाढ केली जाणार आहे.

बस व फेऱ्या

तारीख बस फेऱ्या

१ मे ३ १०

२ मे १० ४२

३ मे १० १००

४ मे १० १०२

सिंहगडावरील बस सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे शनिवारी व रविवारी बसच्या संख्येत वाढ केली जाणार आहे. तसेच पायथ्याशी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे.

- लक्ष्मीनारायण मिश्रा, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे

Web Title: Two Charging Stations Base Possibility Bus On Holiday Sinhagad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top