
शिरूर - कारेगाव (ता. शिरूर) जवळील बाभुळसर खुर्दच्या शिवेवरील एका शेततळ्यातील पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यु झाला. काल (ता. २८) रात्री सातच्या सुमारास घडलेल्या या घटनेत चौघेजण शेततळ्यात बुडाले होते, मात्र दोघांना वाचविण्यात स्थानिक तरूणांना यश आले. या घटनेने रोजगाराच्या शोधात एमआयडीसी परिसरात आलेल्या कामगारांच्या कुटूंबांवर शोककळा पसरली.