पोहायला गेलेली मुलं घरी परतलीच नाहीत; गावावर शोककळा

टीम ई सकाळ
Wednesday, 27 January 2021

दगडखाणीत साठलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी इथं घडली आहे.

पिंपळी(बारामती) : दगडखाणीत साठलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी इथं घडली आहे. सोमवारी सांयकाळी ही घटना घडली असून दोन्ही मुलांचे वय 10 वर्षांपेक्षा कमी आहे. चिमुकल्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत मिळालेली माहिती असी की, बारामती तालुक्यातील पिंपळी इथल्या दगडखाणीत पाणी साठलं असून यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन लहान मुलांचा बुडून मृत्यू झाला. देवा तानाजी शिंदे (वय 9 वर्षे), सम्राट संतोष शिंदे (वय 8 वर्षे) अशी त्यांची नावे आहेत.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

गावापासून अर्धा किलोमीटरच्या अतंरावर मुलं पोहण्यासाठी गेली होती. त्यांचे आई वडिल कामानिमित्त बाहेर गेले होते. ते घरी आल्यानंतर मुले दिसली नाहीत म्हणून शोधाशोध सुरू केली. आई वडिलांनी बराच वेळ शोध घेतल्यानंतर दगडखाणीतल्या पाण्यात त्यांचे मृतदेह आढळले.

हे वाचा - 'तुम्हाला जिवंत सोडत नाही'; जमीन वाटपाच्या रागातून इंदापुरात महिलेचा खून!

खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं मुलं बुडाली असावीत अशी शक्यता वर्तवली जात आहे. बारामती शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी  घटनास्थळी भेट दिली. दोन्ही मुलांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहेत. अधिक तपास बारामती शहर पोलीस करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two childrens died during swimming in baramati