भोरमध्ये पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी पसार; कोठडीचे गज कापले

two Criminal absconded from police Custody in bhor
two Criminal absconded from police Custody in bhor

भोर (पुणे) : येथील पोलिस कोठडीतून मोक्का अंतर्गत दरोड्याच्या गुन्ह्यातील दोन आरोपींनी पोलिस कोठडीचे गज कापून पलायन केले. चंद्रकांत लोखंडे आणि प्रवीण राऊत असे पळून गेलेल्या आरोपींची नावे असून बुधवारी (ता.१७) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

सहा महिन्यांपूर्वी कापूरव्होळ (ता.भोर) येथील ज्वेलर्सच्या दुकानात पोलिसांच्या वेशात जाऊन दरोडा टाकलेल्या दोन आरोपींना राजगड पोलिसांनी ९ फेब्रुवारीला अटक केली होती. तेंव्हापासून ते पोलिस कोठडीत होते. दोन्ही आरोपी हे दरोड्याच्या गुन्ह्यातील असल्यामुळे राजगड पोलिसांचे एक हवालदार आणि तीन पोलिस कर्मचारी कोठडीच्या ड्युटीवर होते. दोन्ही आरोपींसमवेत राजगड पोलिस ठाण्यातील आणखी दोन स्थानिक आरोपीही होते. एकून चार आरोपींपैकी स्थानिक दोन आरोपी पळून गेले नाहीत.


ठाणे अंमलदार यांनी रात्री एक वाजता ड्युटीवरील झोपलेल्या पोलिसांना जागे केले. सकाळी सहा वाजताही त्यांना झोपेतून उठविले त्यावेळी दोन आरोपींनी पलायन केल्याचे लक्षात आले. भोर पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही यंत्रणा खराब झाली आहे. आणि चौपाटी परिसरात नागरिकांनी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेही शिवाजी पुतळ्याचे काम सुरु असल्यामुळे बंद आहेत. त्यामुळे आरोपी पळून कोणत्या दिशेने गेले हे समजणे अवघड झाले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच भोरचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील आणि राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनायक वेताळ यांनी त्वरीत घटनास्थळी जाऊन पोलिस कोठडीची पहाणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com