लोणावळ्यातील अपघातात दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

चिंचवडमधील तरुणांचा समावेश; महामार्गावर वाहतूक विस्कळित

लोणावळा - जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कार आणि ट्रकची समोरासमोर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी (ता. २२) सकाळी पावणेसातच्या सुमारास हा अपघात झाला. 

चिंचवडमधील तरुणांचा समावेश; महामार्गावर वाहतूक विस्कळित

लोणावळा - जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कार आणि ट्रकची समोरासमोर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी (ता. २२) सकाळी पावणेसातच्या सुमारास हा अपघात झाला. 

शाहरुख फकीर पठाण (वय २४, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), अभिजित दयानंद रणपिसे (वय २२, रा. पिंपरी-चिंचवड) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकांची नावे असून, सुमीत मनोहर जाधव (वय २६, रा. आकुर्डी, पुणे) हा गंभीर जखमी झाला आहे. लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शाहरुख, अभिजित व सुमीत हे तिघे मित्र त्यांच्या वेरना कारने (क्रमांक-एमएच-१४/ईपी-५५५०) लोणावळ्याकडे चालले होते. या दरम्यान पनवेल येथून पुण्याकडे सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकला (क्रमांक-एमएच-२६/ एडी-१०१५) पुण्याहून लोणावळ्याकडे सुसाट वेगात जाणारी वेरना कार ट्रकवर समोरासमोर जोरात धडकली. या भीषण धडकेत कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळित झाली होती. अपघाताची माहिती कळताच लोणावळा शहर पोलिस व रस्ते विकास महामंडळाचे आयर्न देवदूत आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. 

पोलिसांनी देवदूत आपत्कालीन पथकाच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या जखमीला व मृतदेहांना कटरच्या साहाय्याने कारचा पत्रा कापून बाहेर काढले. जखमीला तत्काळ उपचारासाठी लोणावळ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मार्गावरील दोन्ही अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने बाजूला केल्यानंतर मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलिस करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two death in lonavala accident