esakal | पुण्यात दोन ठिकाणी फटाक्यांमुळे लागली आग; यंदा दिवाळीत आगीच्या घटना कमी
sakal

बोलून बातमी शोधा

Firecrackers

कोरोनामुक्त आणि कोरोनाबाधित रुग्णांना फटाक्याच्या धुरामुळे श्वसनास होणारा त्रास लक्षात घेऊन राज्य सरकारने यावर्षी फटाके उडविण्यावर निर्बंध घातले होते.

पुण्यात दोन ठिकाणी फटाक्यांमुळे लागली आग; यंदा दिवाळीत आगीच्या घटना कमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर होत असलेल्या यंदाच्या दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नागरीकांनी शहरात मोठ्या प्रमाणात फटाके उडविले. मात्र यावेळी फटाक्यामुळे किरकोळ स्वरुपाच्या दोन आगीच्या घटना वगळता मोठ्या घटना घडल्या नसल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले. 

गुरूवार पेठेतील फुलवाला चौक येथे एका ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागली, तर दुसरीकदे पौड रस्त्यावरील कचरा डेपोजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये फटाक्यांमुळे आग लागल्याची घटना शनिवारी रात्री घडली. दोन्ही ठिकाणी लागलेल्या या किरकोळ स्वरुपाच्या आगी अग्निशामक दलाच्या जवानांनी काही वेळातच आटोक्यात आणली.

मंदिर उघडलं, पण कार्तिकी वारीचं काय? सरकारच्या निर्णयाकडे लागले आळंदीकरांचे डोळे​

कोरोनामुक्त आणि कोरोनाबाधित रुग्णांना फटाक्याच्या धुरामुळे श्वसनास होणारा त्रास लक्षात घेऊन राज्य सरकारने यावर्षी फटाके उडविण्यावर निर्बंध घातले होते. प्रत्यक्षात मात्र नागरीकांनी फटाके उडविण्याचा मोठ्या प्रमाणात आनंद लुटला, नेहमीप्रमाणे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर बाजारपेठेत सायंकाळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

तरी मागील वर्षीच्या तुलनेत फटाके उडविण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे यंदा फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटना कमी झाल्या. रात्री 10 वाजेपर्यंत एक ते दोन किरकोळ घटना वगळता मोठ्या घटना घडल्या नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)