आळंदी परिसरात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन चारचाकी, तेरा मोटारसायकली जळून खाक

विलास काटे
Monday, 25 January 2021

चऱ्होली खुर्दमधील तनिष सृष्टी सोसायटीच्या पार्किंगमध्ये शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन कार, तेरा मोटारसायकल आणि दोन सायकलीं जळून पूर्ण खाक झाल्याची घटना पहाटेच्या वेळी घडली.

आळंदी : चऱ्होली खुर्दमधील तनिष सृष्टी सोसायटीच्या पार्किंगमध्ये शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन कार, तेरा मोटारसायकल आणि दोन सायकलीं जळून पूर्ण खाक झाल्याची घटना पहाटेच्या वेळी घडली. आळंदी पालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला.

पुण्यात मटणाचे दर का वाढले?; जाणून घ्या 4 प्रमुख कारणे​

याप्रकरणी फिर्याद विजयकुमार गुणवंतराव जाधव (वय ४१, चऱ्होली खुर्द) यांनी दिली. पहाटे चारच्या सुमारास पार्किंगमध्ये अचानक स्फोट झाला. आवाजामुळे नागरिकांनी पार्किंगच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी पार्किंगमधिल चारचाकी आणि दुचाकी गाड्या पेट घेत होत्या. अचानक पहाटेच्यावेळी लागलेली आग पाहून नागरिकांची घबराट झाली. त्यातही काहींनी घरातील पाईपच्या साहाय्याने पाण्याचा फवारा मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचा भडका मोठा असल्याने चारचाकी, दुचाकी वाहने तसेच सायकली भस्मसात झाल्या.

दरम्यानच्या काळात आळंदी पालिकेची अग्निशमनची गाडी आली आणि आग आटोक्यात आणली. आगीच्या ज्वाळा एवढ्या मोठ्या होत्या की पहिल्या मजल्यावरिल खिडकी तसेच दरवाजापर्यत झळ पोचली होती. मात्र वेळेत आलेल्या आळंदी पालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाडीमुळे पुढिल अनर्थ टळला. तरिही इमारतीच्या दुस-या मजल्यापर्यंत धुरामुळे इमारत काळवंडली होती. 

धक्कादायक! टेकडीवर जॉगिंगसाठी गेलेल्या पुणेकरांच्या 9 गाड्या फोडल्या​

कुणीतरी ति-हाईत व्यक्तीने गाड्या पेटवल्याचा संशय येथील रहिवासियांना आहे. मात्र सुरक्षा रक्षक असतानाही अन्य इसम सोसायटीत कसा आला. की सोसायटीतील कुणी कृत्य केले. याचा तपास आता तेथील सीसीटीव्ही यंत्रणा पाहून आळंदी पोलिस करत आहे. सध्या शॉटसर्किटमुळेच आग लागल्याची नोंद आळंदी पोलिस ठाण्यात केली गेली आहे.

(संपादन : सागर डी. शेलार) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two four-wheelers, thirteen motorcycles burnt in fire caused by short circuit in Alandi area

Tags
टॉपिकस
Topic Tags: