धक्कादायक! टेकडीवर जॉगिंगसाठी गेलेल्या पुणेकरांच्या 9 गाड्या फोडल्या

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

फिर्यादीच्या कारची काच फोडून सात हजार रुपये किंमतीचा मोबाईल, रोख रक्कम असा 22 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

पुणे : चतुःशृंगी टेकडीवर फिरण्यासाठी गेलेल्या नागरीकांची पाषाण रस्त्यावर उभी केलेली नऊ वाहने अनोळखी व्यक्तींनी फोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेत नागरीकांच्या वाहनांचे 85 हजार रुपयांचे नुकसान झाले असून याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी सकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास घडली. 

MHT-CET परीक्षा तालुक्याच्या ठिकाणी होणार? सीईटी सेलने सुरू केल्या हालचाली!​

याबाबत 47 वर्षीय व्यावसायिकाने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चतुःश्रुंगी टेकडीवर सकाळी फिरण्यासाठी येणारे नागरिक त्यांच्या कार या पाषाण रस्त्यावर पार्क करतात. रविवारी सकाळी देखील या ठिकाणी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी पोलिस संशोधन केंद्र ते अभिमान श्री सोसायटी दरम्यान रस्त्यावर वाहने पार्क केली होती.

पुण्यात १३ तृतीयपंथीयांना अटक; सिग्नलवर वाहनचालकांना धमकावून उकळायचे पैसे​

सकाळी सहा ते सव्वा सातच्या सुमारास अज्ञात चोरट्याने या कारच्या कारच्या फोडल्या. फिर्यादीच्या कारची काच फोडून सात हजार रुपये किंमतीचा मोबाईल, रोख रक्कम असा 22 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादी प्रमाणेच इतर नऊ कारच्या काचा फोडून 85 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे समोर आले आहे. टेकडीवर फिरून आल्यानंतर नागरिकांना त्यांच्या कारच्या काचा फोडल्याचे दिसून आले. तसेच, त्यांच्या कारमधील मोबाईल व इतर ऐवज चोरून नेल्याचेही निदर्शनास आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vehicles of Pune citizens who went for a walk on Chaturshringi hill were broke up