बारामती : मोडवे येथे अल्पवयीन मुलींनाच कोरोनाची बाधा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

तालुक्यातील मोढवे येथील दोन अल्पवयीन मुलींना कोरोनाची बाधा झाल्याचे आज निष्पन्न झाले.

बारामती : तालुक्यातील मोढवे येथील दोन अल्पवयीन मुलींना कोरोनाची बाधा झाल्याचे आज निष्पन्न झाले. संबंधित मुलीच्या आईची चाचणी मुंबईमध्ये पॉझिटीव्ह आल्यानंतर या दोन मुलींच्या घशातील द्रावाचे नमुने घेण्यात आले होते. आज त्याचा रिपोर्ट आल्यानंतर या दोन मुलींनाही कोरोनाची बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे . यापैकी एका मुलीचे वय सात वर्षे असून दुसरी मुलगी सतरा वर्षांची आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान या मुळे गावात प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. बारामतीमधील कोरोना ग्रस्तांची संख्या आता 25 वर गेली आहे, मात्र या पैकी 19 रुग्ण बरे झाले असून तीन रुग्णांचा मृत्यू झाला होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन करण्यासोबतच आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. परगावाहून येणाऱ्या व्यक्तींमुळे कोरोना वेगाने पसरत आहे. त्यामुळे गावातून येणाऱ्या लोकांनी स्वतःहून विलगीकरण कक्षात जायला हवे अशा सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two girls were found corona positive at modave