भोरमध्ये कोरोनाच्या लढाईला धक्का, दोन सरकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू 

bhor
bhor

भोर (पुणे) : भोर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील सहायक सरकारी वकील अॅड. सुहास धुमाळ (वय ४८) आणि वीज महावितरण कंपनीमध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ पदावर कार्यरत असलेले चंद्रकांत लेकावळे (वय ५९) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

चंद्रकांत लेकावळे यांचा सोमवारी (ता. १०) आणि अॅड. सुहास धुमाळ यांचा मंगळवारी (ता. ११) मृत्यू झाला. दोन्ही कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमुळे न्यायालयातील कर्मचारी, वकील, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह सर्व शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. 

चंद्रकांत लेकावळे यांना १८ दिवसांपूर्वी त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अॅड. सुहास धुमाळ हे लॉकडाउनच्या काळात भोरमध्ये न्यायालयाच्या निवासस्थानात राहत होते. पुण्याला गेल्यावर त्यांना त्रास सुरु झाला. त्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली. त्यांचीही चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्यांनी त्वरित हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यास सुरुवात केली. मागील वीस दिवसांपासून त्यांना स्वसनाचा त्रास सुरु होता. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु, त्यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com