esakal | हर्षवर्धन पाटलांमुळे जिल्ह्यात काँग्रेसमध्ये दोन गट
sakal

बोलून बातमी शोधा

harshvardhan-patil

 राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे पुणे जिल्हा काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत.

हर्षवर्धन पाटलांमुळे जिल्ह्यात काँग्रेसमध्ये दोन गट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे पुणे जिल्हा काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. परिणामी, इंदापूर तालुक्‍यातील काँग्रेसचे सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि इंदापूर नगरपालिकेचे नगरसेवक आदींनी पाटील यांच्यासमवेत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला नसला, तरी या सर्वांनी विधानसभा निवडणुकीत पाटील यांचाच प्रचार केल्याची चर्चा जिल्हा काँग्रेसमध्ये रंगू लागली आहे. परिणामी, इंदापूर तालुक्‍यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवरील काँग्रेसचे लोकप्रतिनिधी हे आता केवळ तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये उरले आहेत. सध्या या सर्वांची स्थिती मनाने भाजप आणि देहाने काँग्रेसमध्ये असल्यासारखी झाली आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

यामध्ये इंदापूर तालुक्‍यातून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इंदापूर नगरपालिकेवर काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. यामुळे इंदापूर नगरपालिका आणि पंचायत समितीत काँग्रेसचे बहुमत असले, तरी या दोन्ही संस्था हर्षवर्धन पाटील गटाच्या ताब्यात जाणार आहेत. या दोन्ही संस्था केवळ कागदोपत्री काँग्रेसच्या ताब्यात असणार आहेत. कारण, या संस्थांवरील काँग्रेसचे सर्व लोकप्रतिनिधी हे हर्षवर्धन पाटीलसमर्थक असून, ते आजही त्यांच्यासोबत आहेत. मात्र, त्यांनी अद्यापही भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केलेला नसल्याचे जिल्हा काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.

इंदापूर तालुक्‍यातील सातपैकी तीन जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसचे आहेत. पंचायत समितीत १४ पैकी ९ सदस्य आणि इंदापूर  नगरपालिकेतील १७ पैकी ९ नगरसेवक हे काँग्रेसचे आहेत. शिवाय, नगराध्यक्षा अंकिता शहा याही काँग्रेसच्या आहेत. याशिवाय, कर्मयोगी शंकरराव पाटील आणि नीरा भीमा हे दोन कारखाने पाटील यांच्याकडे आहेत.

झेडपीत तीन विरुद्ध चार सदस्य
पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे येथे पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला अन्य कोणत्याही पक्षाच्या मदतीची गरज भासणार नाही. याउलट जिल्हा परिषदेत काँग्रेसचे केवळ सात सदस्य आहेत. यामध्ये इंदापूर तालुक्‍यातील तीन, भोर व पुरंदरमधील प्रत्येकी एक आणि वेल्हे तालुक्‍यातील दोन सदस्यांचा समावेश आहे. यापैकी इंदापुरातील तीन सदस्य हर्षवर्धन पाटील यांचे समर्थक आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील काँग्रेस सदस्यांमध्ये पाटीलसमर्थक तीन विरुद्ध चार असे दोन गट निर्माण झाले आहेत.

loading image