

Maratha History Two Rare Seals of Baramati Statesman Babuji Naik Discovered at Pune Archives for the First Time
sakal
वडगाव निंबाळकर : मराठेशाहीतील बारामतीचे थोर मुत्सद्दी सरदार बाबूजी नाईक जोशी बारामतीकर यांचे दोन ऐतिहासिक शिक्के प्रथमच उजेडात आले आहेत. पुण्यातील पुरालेखागारात दख्खन इतिहास संशोधन संस्थेचे अभ्यासक निखिल भापकर यांना हे शिक्के मिळाले. मु. सा. काकडे महाविद्यालयातील इतिहास अभ्यासक प्रा. दत्तात्रय जगताप यांनी या शिक्क्यांचे विश्लेषण केले आहे.