मुंबई-बंगळुरू मार्गावर पुन्हा दोन तासांचा 'ब्लॉक' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

two-hour block on Mumbai-Bangalore chadani chowk Traffic transport closed pimpri

मुंबई-बंगळुरू मार्गावर पुन्हा दोन तासांचा 'ब्लॉक'

पिंपरी : मुंबई-बंगळुरू मार्गावरील चांदणी चौक येथील पूल पाडल्यानंतर लेन वाढविण्यासाठी स्फोटकाने रस्त्यालगतचा खडक फोडला जात आहे. यासाठी मंगळवारी रात्री साडे अकरा ते बुधवारी रात्री दीड असा दोन तासांचा 'ब्लॉक' घेतला जाणार आहे. मुंबईहून बंगळुरूच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा ब्लॉक असून या मार्गावरील वाहतूक वाकडमधून वळविण्यात येणार आहे. रविवारी पूल पाडल्यानंतर आता लेन वाढविण्यासाठी लगतचे खडक फोडायचे काम सुरू आहे. यासाठी सोमवारी दुपारी पाऊण तासांसाठी वाहतूक थांबवली होती.

उर्वरित खडक फोडण्यासाठी पुन्हा ब्लॉक घेतला जाणार आहे. मुंबईहुन बंगळुरूकडे येणाऱ्या मार्गावर हा ब्लॉक असेल. खडक फोडण्यासाठी १६ ठिकाणी छिद्र घेऊन स्फोट करण्यात येणार आहे. हे स्फोट होताना बंगळुरुहुन मुंबईकडे जाणारी वाहतूकही दहा ते पंधरा मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे. स्फोट झाल्यानंतर लगेचच या मार्गाची वाहतुक सुरू होईल. मात्र, मुंबईहुन बंगळुरुकडे जाणारी वाहतूक राडारोडा हटविल्यानंतर रात्री दीडनंतर सुरू होईल. यादरम्यान, ही वाहतूक वाकडमार्गे वळविण्यात येणार आहे. येथून शिवाजीनगर, कात्रजमार्गे पुढे जाता येईल.