
पुणे : येरवडा येथील महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड सोसायटीमधील आदित्य नारायण सहकारी गृहरचना सोसायटीतील एम-२४ ही इमारत अत्यंत जीर्ण आणि धोकादायक झाली आहे. गेल्या १५ वर्षांपासून इमारत मोडकळीस आली असून, इमारतीच्या पुनर्विकासासंदर्भात महापालिकेकडून वारंवार टाळाटाळ केली जात आहे. अनेकदा प्रयत्न करूनही प्लॅन मंजुरीची प्रक्रिया प्रलंबित असल्याने रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.