क्रुझर-स्कुटीच्या धडकेत दाम्पत्य जागीच ठार 

डी. के. वळसे
रविवार, 13 मे 2018

स्कुटीला मागच्या बाजूने क्रुझरने (एम एच १४ इ एच ९१३९) ने धडक दिली. वीस ते पंचवीस फुट अंतरापर्यंत स्कुटीला फरपटत नेले.

मंचर - पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पेठ (ता. आंबेगाव) येथे रविवारी (ता. १३) दुपारी क्रुझर गाडीने स्कुटीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कोल्हारवाडी (ता. आंबेगाव) येथील वृद्ध दाम्पत्य जागीच ठार झाले. दशरथ गेनभाऊ गावडे (वय ६२ ) व मंदा दशरथ गावडे (वय ५५) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. दशरथ गावडे व त्यांची पत्नी मंदा गावडे अवसरी खुर्द येथे लग्न समारंभांसाठी गेले होते. साखरपुड्याचा कार्यक्रम झाल्यानंतर ते स्कुटी (एम.एच.१४ बी एस ८०९२) हून राष्ट्रीय महामार्गावरून पेठ गावाकडे जात होते. स्कुटीला मागच्या बाजूने क्रुझरने (एम एच १४ इ एच ९१३९) ने धडक दिली. वीस ते पंचवीस फुट अंतरापर्यंत स्कुटीला फरपटत नेले.

दरम्यानच्या काळात एन डी आर एफ चे पथक तेथून जात होते. त्यांनी मदत केली. गावकऱ्यांनी रुग्णवाहिका बोलविली होती. पण दांपत्यांनी प्राण सोडले होते. दोघांचे मृतदेह शिरूर लोकसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख जयसिंग एरंडे, अशोक बाजारे, शरद एरंडे यांच्या सह ग्रामस्थांनी मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले आहेत. धनेश एरंडे यांनी याबाबत मंचर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. मंचर पोलिसांनी पंचनामा केला आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

 

Web Title: Two killed in accident at pune nasik national highway