esakal | बारामती-इंदापूर राज्यमार्गावर अपघातामध्ये दोघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती-इंदापूर राज्यमार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू

बारामती-इंदापूर राज्यमार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू

sakal_logo
By
राजकुमार थाेरात

वालचंदनगर (ता.इंदापूर) : येथे बारामती-इंदापूर राज्यमार्गावर (baramati indapur road) टेम्पोला जोडलेला मिक्सरचा रॉड तुटल्याने मिक्सरच्या धडकेने दोघा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातामध्ये अशोक दिनकर कांबळे ( वय ५६) व राजेंद्र बाळु अडकिते ( वय ५५,रा. दोन्ही रा.रूई,ता.इंदापुर) या दोघांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी अतुल अशोक कांबळे (रा.रुई) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी टेम्पो चालक जॉकी पोपट कांबळे, (रा.अंथुर्णे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण भागामध्ये बांधकाम व्यावसायिक व ठेकेदार इमारतींचा स्लॅब टाकण्यासाठी मिक्सरचा उपयोग करतात. मिक्सर हा टेम्पो किंवा पिकअप गाड्यांना ट्रॉलीसारखा जोडून त्यांची वाहतुक केली जाते. टेम्पो व पिकमध्ये कामगाराना जीव धोक्यात प्रवास करावा लागतो.

हेही वाचा: 'मनी हाईस्ट'वरुन यशोमती ठाकूर यांचं राजकीय ट्वीट; म्हणाल्या...

वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार शुक्रवार (ता.३) रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अंथुर्णे गावाजवळ बारामती-इंदापुर राज्यमार्गाने जॉकी कांबळे हे टेम्पोला जोडलेला मिक्सर घेवून अंथुर्णे बाजुकडून इंदापूरकडे चालले होते. अंथुर्णे गावच्या जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या चाललेल्या टेम्पोला जोडलेला मिक्सचा रॉड तुटल्याने मिक्सर पाठीमागून येत असल्याने अशोक कांबळे व राजेंद्र अडकिते यांच्या दुचाकीला मिक्सर धडकल्याने झालेल्या अपघातामध्ये दोघे ही गंभीर जखमी झाले.

त्यांच्यावर उपचार सुरु असताना दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी टेंम्पो चालकावर गुन्हा दाखल केला असून तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे करीत आहेत.

loading image
go to top