पुणे - भरधाव वाहनांच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटना विश्रांतवाडी आणि कोंढवा परिसरात घडल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांत वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडीतील मेंटल कॉर्नर चौकात रविवारी (ता. १५) सकाळी साडेसहाच्या सुमारास रस्ता ओलांडणाऱ्या रिक्षाला भरधाव कारने जोरात धडक दिली. रिक्षा उलटल्याने प्रवासी संगीता अनिल साठे (वय ५१, रा. शांतीनगर, येरवडा) यांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला, तर रिक्षाचालक जखमी झाला. याबाबत ईश्वर येदू वाघमारे (वय-६५) यांनी फिर्याद दिली आहे..दुसऱ्या घटनेत, कोंढव्यातील एनआयबीएम चौकात ११ नोव्हेंबर रोजी सकाळी दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात गंभीर जखमी झालेले दशरथ सहदेव प्रसाद यांचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सौरभ पंकज आवळे (वय २५, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार इरफान मौलाली बावाशे (वय-१९, रा. हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.