Crime News : देशविघातक कृत्याच्या संशयावरून पुण्यात दोघेजण ताब्यात

मध्य प्रदेशातील या दोघांचा देशविघातक कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे.
crime news
crime newsesakal

पुणे - पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान दोघांना देशविघातक कृत्याच्या संशयावरून ताब्यात घेतले आहे. या नाकाबंदीदरम्यान त्यांचा तिसरा साथीदार पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.

मध्य प्रदेशातील या दोघांचा देशविघातक कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे. कोंढवा परिसरातील या संशयितांच्या घरातून लॅपटॅाप आणि कुऱ्हाड जप्त करण्यात आली आहे. या लॅपटॅापमध्ये देशविघातक कृत्यांसंदर्भात काही साहित्य पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे.

या पार्श्वभूमीवर एटीएस, गुप्तचर यंत्रणा तपास करीत आहेत. दरम्यान, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक यांच्या म्हणण्यानुसार, दुचाकी चोरताना या दोघांना ताब्यात घेतले असून, पोलिस त्यांची कसून चौकशी करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com