लांडेवाडीतील खूनाचे पोलिसांनी असे उलगडले कोडे

crime
crime

घोडेगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी- पिंगळवाडी येथील सुदाम विठ्ठल पिंगळे (वय ६०) यांना लोखंडी हातोड्याने मारहाण करून अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोकड काढून घेऊन त्यांचा खून केल्याच्या आरोपावरून दोन जणांच्या विरोधात घोडेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एकाला अटक करण्यात आली असून, दुसऱ्याच्या शोधात पोलिस आहेत, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली.

सुदाम विठ्ठल लांडे हे बेपत्ता झाल्याची फिर्याद घोडेगाव पोलिस ठाण्यात दाखल होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत लांडेवाडीच्या अंगणवाडीजवळील कालव्याजवळ २२ जुन रोजी मिळाला. परंतु, सदर ठिकाण मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे. संबंधित व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू असल्याने त्यादृष्टीने उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे आणि मंचर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला. तसेच, सुदाम लांडे यांचा मुलगा अक्षय लांडे यांनी, माझ्या वडिलांचा खून झाला असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास करावा, अशी मागणी केली होती.

त्यानुसार पोलिसांनी केलेल्या तपासात लांडेवाडी अंगणवाडी गावच्या हददीत डिंभे उजवे कालव्याजवळ जंगलात विकी सुरेश एरंडे (रा. हुलेस्थळ, नारोडी), ऋषिकेश रमेश मोरे (रा. नारोडी) या दोघांनी  सुदाम विठ्ठल लांडे यांना मोटार सायकलवर जबरदस्तीने बसवून घेऊन लोखंडी हातोड्याने मारहाण करुन त्यांचा खून केला. तसेच, त्यांच्या अंगावरील दोन तोळ्याची सोन्याची चैन आणि ३ ते ४  हजार रुपये रोख रक्कम काढून घेऊन त्यांचा मृतदेह कालव्याच्या पाण्यात टाकून दिल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.

सदर गुन्हा मंचर पोलिस ठाण्याच्या वतीने घोडेगाव पोलिस ठाण्याकडे पुढील तपासासाठी गुरुवारी (ता. १३) वर्ग केला आहे. ऋषिकेश रमेश मोरे याला घोडेगाव पोलिस ठाण्याच्या पथकाने अटक केली. घोडेगाव न्यायालयाने त्याला 18 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर, विकी सुरेश एरंडे याच्या मागावर पोलिसांचे पथक असून, लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com