esakal | उड्डाणपूलाला दुचाकी धडकल्याने दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

उड्डाणपूलाला दुचाकी धडकल्याने दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू

sakal_logo
By
राजेंद्रकृष्ण कापसे

कर्वेनगर : कर्वेनगर येथे उड्डाणपूलाला दुचाकी धडकल्याने दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ते दोघे वारजे रामनगर परिसरातील रहिवाशी आहेत. बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली.

वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर खटके यांनी दिलेल्या माहिती नुसार, शंकर इंगळे, वय २२ रामनगर, सलील इस्माईल कोकरे (वय २४ वारजे गावठाण) अशी त्या दोघांची नावे आहेत.

वारजे येथून ते दोघे कोथरूडच्या दिशेने जात होते. कर्वेनगर येथील उड्डाणपूल संपत आल्यावर त्यांच्या दुचाकींचा वेग जास्त असल्याने उड्डाणपूलाच्या कठड्याला जोरात बसली. त्यामुळे, त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अशी माहिती प्रत्यक्षदर्शी यांनी पोलिसांना दिली. कर्वेनगर पोलिस चौकीच्या समोर कोथरूड बाजूस घटनास्थळ आहे. वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या कर्वेनगर चौकीतील अधिकारी कर्मचारी धावत तेथे पोचले. तातडीने रुग्णावाहिका बोलाविली. त्यांना तेथून घेऊन गेले आहेत. अकरा वाजण्याच्या सुमारास घडली असावी. अपघातानंतर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

loading image
go to top