एकाच दुकानात पुन्हा चोऱीचा प्रयत्न चोरट्यांच्या आला अंगलट; दोघांना अटक

Two thieves arrested by the police while Another burglary attempt
Two thieves arrested by the police while Another burglary attempt
Updated on

नारायणगाव : येथील  पुणे नाशिक महामार्गलगत गणपिर वस्ती येथील टायर दुकानात  पाच महिन्यापूर्वी केलेली चोरी यशस्वी झाल्या नंतर पुन्हा दुसऱ्यांदा चोरी करण्याचा दोन चोरट्यांचा प्रयत्न अंगलट आला आणि चोर अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकले. आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी समीर उर्फ पप्पू संतोष पारधी, सोमा पोपट दुधावडे (दोघेही राहणार नंबरवाडी,वारूळवाडी, तालुका जुन्नर) यांना अटक केली असुन जुन्नर न्यायालयाने आरोपींना एक दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक डी. के.गुंड यांनी दिली.

आरोपी समीर पारधी व सोमा दुधावडे यांनी मे महिन्यात येथील साई टायर्स या दुकानाची खिडकी तोडून ६ हजार ५०० रुपये किमतीच्या पाच टायरची चोरी केली होती.
कोरोनामूळे लॉकडाऊनची पार्श्वभूमी असल्याने मालक प्रकाश दगडू खैरे यांनी या बाबतची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली नाही. ही चोरी यशस्वी झाल्यामूळे आरोपींनी ९ ऑक्टोबर २०२०ला रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास खिडकी तोडून पुन्हा चोरी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मालक प्रकाश खैरे घटनास्थळी आले असता आरोपी पसार झाले. मात्र, आरोपींना खैरे  यांनी ओळखले. या बाबतची फिर्याद खैरे यांनी नारायणगाव पोलिस स्टेशनमध्ये दिली.

कर्करोगाचा धोका ओळखता येणार; पुण्यातील तज्ज्ञांचे संशोधन

खैरे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी काल(ता.११) आरोपींना अटक केली.आरोपींकडून तीन टायर जप्त केले.जुन्नर न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com