

After Being Robbed from a Truck, Woman Dies in Fatal Tempo Crash Near Shirur
esakal
शिरूर: दिवसभर कष्ट करून थकून - भागून मालट्रक मधून घरी निघालेल्या महिलेला ट्रकचालकासह दोघांनी लुटून वाहनातून ओढून ढकलून दिले. मदतीची याचना करीत थांबलेल्या या महिलेला आधार मिळाला एका ज्येष्ठाचा. अन् मदतीच्या भावनेने ते या महिलेला दूचाकीवरून तीच्या घरी सोडवायला निघाले. मात्र, दुर्दैवाचे भोग आडवे आले आणि या दूचाकीला भरधाव वेगातील टेम्पोने धडक दिली. यात टेम्पोचे चाक डोक्यावरून गेल्याने या अभागी महिलेचा जागीच मृत्यु झाला, तर ज्येष्ठ नागरीकही जखमी झाले. शनिवारी (ता. २७) रात्री उशिरा शिरूरच्या बायपासवर हा दुर्दैवाचा फेरा घडला.