ऐकावे ते नवलच! कोरोनामुळे चक्क सवत झाली लाडकी; एकाच ठिकाणी दोघी क्वारंटाइन

photo 1.jpg
photo 1.jpg

कोथरुड (पुणे) : बानाई दोहीच्या दोन जाती, जेवल्या एका ताटी, मल्हारी देवासाठी हे लोकगीत महाराष्ट्रातील जनमानसात चांगलेच रुळलेले आहे. खंडोबाची पत्नी म्हाळसा व बानाई यांचे एकमेकांशी पटत नसते. परंतु, पतीदेवाला खुश करण्यासाठी त्या दोघी एका ताटात जेवल्या, त्यांनी अबोला सोडला असे या गीतात वर्णिले आहे. काहीसा असाच प्रकार एका कोरोना बाधिता व्यक्तिच्या कुटुंबात घडला आहे.

एका कंपनीमध्ये वाहन चालक असणा-या या व्यक्तीला कोरोना असल्याचे सिध्द झाल्यावर आरोग्य खात्याने या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची यादी तयार करायला सुरुवात केली. त्यावेळी लक्षात आले की, या महाशयांचा दोन ठिकाणी घरोबा आहे. दोन्ही घरी प्रत्येकी दोन अपत्ये आहेत. एवढेच नव्हे तर नातवंडे देखील आहेत. अर्थात दोन्ही महिलांना आपल्या पतीचा इतिहास माहिती होता. दोघीही वेगवेगळ्या ठिकाणी रहात असून एकमेकांशी संबंध ठेवत नव्हत्या.

चालकाच्या दोन्ही घरोब्यातील व्यक्तींना एकाच इमारतीत क्वॉरंटाइन करण्यात आल्याने आता नाइलाजाने का होईना दोन्ही कुटुंबाचे समोरासमोर येत आहे. येथे सुध्दा दोघीही वेगवेगळ्या खोल्यात रहात आहेत. मात्र, आपला पती कोरोनातून लवकर बरा व्हावा ही परमेश्वराकडे करत आहेत. विशेष म्हणजे आता दोघीही बोलू लागल्या आहेत. एकीकडे कोरोनामुळे जिथे सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्स) ठेवणे भाग पडत आहे तेथे दोन्ही सवती कोरोनामुळेच एकत्र आल्याचे चित्र आहे. 

आता दोघींकडेही एकच काम आहे. ते म्हणजे आपला स्वतःचा व कुटुंबियांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह येवू नये म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करणे आणि दुसरीकडे कोरोनातून लवकर नव-याच्या सुटकेसाठी देवाला साकडे घालणे. दोघीही हे काम इनामे इतबारे करत आहेत. या घटनेमुळे लोक म्हणत आहेत की, कौन म्हणतोय कोरोना लोकात अंतर पाडतो. येथे तर सवती सवती जवळ आल्यात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com