पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात दोन तरूण ठार

accident
accident
Updated on

मंचर : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर जवळ अवसरी फाटा (ता. आंबेगाव) येथे मंगळवारी (ता. १७) सकाळी मोटरसायकल व डंपर यांची समोरासमोर धडक झाली. त्याच वेळी आलेल्या एसटी गाडीच्या चाकाखाली गेल्यामुळे मोटरसायकल वरील दोघे तरुण जागीच ठार झाले.

संकेत आनंदराव भोईटे (वय23) व ओंकार भीमराव भोईटे (वय20, दोघे रा. आरडगाव ता. फलटण, जि. सातारा) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

संकेत भोईटे वओंकार भोईटे मोटर सायकल (एम एच 14 एफ ए 5734) वरून मंचर च्या दिशेला जात होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने आलेला डंपर (एम एच 12 आर एन 7169) व मोटरसायकल यांची समोरासमोर धडक झाली. त्यावेळी मंचरच्या बाजूने नाशिक मलकापूर एसटी गाडी (एम एच 11 टी  9286) आली होती.

दोघे मोटरसायकलवरून उडून एसटी गाडीच्या चाकाखाली गेले. त्यामध्ये संकेत भोईटे चा जागेवर मृत्यू झाला. तर ओंकार भोईटे ला जखमी अवस्थेत मंचरला नेत असताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून दोन्ही भोईटे यांचे शवविच्छेदन करण्यासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात प्रक्रिया सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com