दुचाकीवरुन गावी जाणे बेतले जिवावर; दोन तरुणांचा लोणी काळभोर येथे मृत्यू

जनार्दन दांडगे
Monday, 30 November 2020

नादुरुस्त ट्रक चुकवण्याच्या नादात दुचाकी रस्त्याच्या बाजूच्या पत्र्याच्या शेडला धडकून झालेल्या अपघातात उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

लोणी काळभोर : पुणे-सोलापुर महामार्गावर लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत रस्त्यात उभा असलेला नादुरुस्त ट्रक चुकवण्याच्या नादात दुचाकी रस्त्याच्या बाजूच्या पत्र्याच्या शेडला धडकून झालेल्या अपघातात उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विनायक अंबरूषी मोरे (वय ३७, रा. गणेगाव, ता भुम, जि उस्मानाबाद) व त्यांचा मित्र ईश्वर व्यंकटराव मुंगळे (वय २५, रा. हलगारा, ता. निलंगा, जि. लातूर दोघेही सध्या रा. युआरसी अपार्टमेंट, लोधीवली, दान फाटयाजवळ, रसायणी, पनवेल, जि. रायगड) ही त्या अपघातात मुत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. वरील अपघात रविवारी (ता. २९) मध्यरात्रीच्या सुमारास लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परीसरात झाला आहे.

मुंबई-पुणे 'एक्सप्रेस वे'वर दुधाचा टँकर उलटला; वाहतूक विस्कळीत

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद जिल्ह्याती रहिवाशी असलेले विनायक मोरे व ईश्वर मुंगळे हे दोघेजण ठाणे जिल्हातील अंबरनाथ परीसरातील अंन्वेन्टीया हेल्थ केअर या कंपनीत तंत्रज्ञ म्हणून काम पहातात. विनायक मोरे व ईश्वर मुंगळे या दोघांनाही सुट्टी मिळाल्याने, वरील दोघेही रविवारी दुचाकीवरुन गावाकडे निघाले होते. विनायक मोरे हा दुचाकी चालवत होता. तर ईश्वर मुंगळे हा मोरे याच्या पाठीमागे बसला होता. वरील दोघेही दुचाकीवरुन लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा येथून सोलापूर बाजूकडे जात असताना, त्यांना पुणे-सोलापूर महामार्गावर जय भवानी गॅरेज समोर रस्त्यातच पाईप भरलेला ट्रक उभा असल्याचे अचानक लक्षात आले. रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकी धडकू नये म्हणून, मोरे याने तो ट्रक चुकवण्यासाठी दुचाकी महामार्गाच्या खाली घेतली. 

पुण्यातील येरवडा, विश्रांतवाडी, वडगावशेरी, धानोरी भागात मिळणार पुरेसे पाणी कारण..

दरम्यान महामार्गावरुन खाली घेत असताना मोरे यांचा मोटारसायलवरचा ताबा सुटल्याने मोटारसायकल सहीत वरील दोघेही गॅरेजच्या शेडच्या लोखंडी खांबाला धडकले. यात मोरे व मुंगळे यांच्या डोक्याला व हाताला मार लागल्याने दोघेही जागीच मृत झाले. अपघाताची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वरील दोघांनाही अपघात स्थळापासून वर आणले. व मोरे यांच्या खिशातील कागदपत्रावरुन, मोरे यांचे मावसभाऊ मिलींद विश्वनाथ मोरे (केशवनगर, मुंढवा, पुणे ) यांच्याशी संपर्क साधला. वरील दोघांचीही ओळख पटली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरज बंडगर व त्यांचे सहकारी करत आहेत.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two youths die in an accident at Loni Kalbhor