esakal | बारामती : भरधाव टेम्पोने दुचाकीला उडवले; दोन युवक जागीच ठार!
sakal

बोलून बातमी शोधा

Crime_Accident

नातेपुते येथील दोन युवक दुचाकीवरुन रविवारी उरुळी-कांचनकडे निघाले होते. त्याच वेळेस एक टेंपो बारामतीहून इंदापूरकडे निघाला होता.

बारामती : भरधाव टेम्पोने दुचाकीला उडवले; दोन युवक जागीच ठार!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बारामती : भरधाव वेगातील टेंपो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दोन युवकांचा रविवारी (ता.६) संध्याकाळी जागीच मृत्यू झाला. बारामती-इंदापूर राज्य मार्गावर भवानीनगर नजिक हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या युवकांची अद्याप ओळख पटलेली नसून उत्तरीय तपासणीसाठी त्यांचे मृतदेह बारामतीला आणले जाणार आहेत.

मद्यधुंद पोलिस निरीक्षकाने ५ जणांना उडवले; एकाचा जागीच मृत्यू तर...​ 

नातेपुते येथील दोन युवक दुचाकीवरुन रविवारी उरुळी-कांचनकडे निघाले होते. त्याच वेळेस एक टेंपो बारामतीहून इंदापूरकडे निघाला होता. भवानीनगर नजिक नीरा डावा कालव्याच्या पूलाच्या अलिकडील बाजूस समोरासमोर हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर सदर ट्रकचालक फरारी झाला आहे. 

सदर घटनेची माहिती पोलिसांना कळल्यावर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला होता, असे पोलिसांनी सांगितले. याच ठिकाणी या पूर्वीही एक अपघात झालेला होता. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)