
अपघातानंतर त्यांना शिक्रापूर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
तळेगाव-ढमढेरे (पुणे) : निमगाव म्हाळुंगी (ता.शिरूर) येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी दुर्घटना रविवारी (ता.११) सायंकाळी घडली, अशी माहिती शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी दिली.
येथील युवक हर्षद दत्तात्रय चव्हाण (वय २३) हा दुचाकीवरून (एम.एच. १२, सीए २४७७) निमगाव म्हाळुंगी गावातून निमगाव फाट्याकडे जात होता. त्यावेळी अंकुश बापू चोरामले (रा.विठ्ठलवाडी, ता.शिरूर) हा विरुद्ध बाजूने दुचाकीवरून (एम.एच. १२, केडब्ल्यू ०८१४) निमगाव-म्हाळुंगीकडे येत होता. यावेळी दोन्ही गाड्यांची जोरात धडक बसून दोन्ही दुचाकीचालक गंभीर जखमी झाले.
- कृषी कायद्यांना स्थगिती द्या, समिती नेमा; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं
अपघातानंतर त्यांना शिक्रापूर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. सदर अपघात रविवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास झाला. यामध्ये हर्षद चव्हाण आणि अंकुश चोरामले हे दोघेही दुचाकी चालक मृत्युमुखी पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलिस करीत आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)