

Former BJP Corporator Uday Joshi Passes Away
Sakal
पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी (वय ६३) यांचे शुक्रवारी सकाळी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. न्यायालयात जामिनासाठी अर्ज प्रलंबित असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. सिंहगड रस्ता परिसरातील गॅस वितरण एजन्सीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून ठेवीदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.