हलगर्जीपणा खपवून घेणार नाही; सामंत यांच्याकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी

ब्रिजमोहन पाटील
Saturday, 20 February 2021

कंत्राटदाराने काम केले नाही तर अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करायचा असतो. पण इथे मंत्र्यालाच तीन तीन वेळा प्रत्यक्ष येऊन कामाची पाहणी करावी लागत आहे. ही असली कामाची पद्धत बरोबर नाही, यापुढे हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.

पुणे - कंत्राटदाराने काम केले नाही तर अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करायचा असतो. पण इथे मंत्र्यालाच तीन तीन वेळा प्रत्यक्ष येऊन कामाची पाहणी करावी लागत आहे. ही असली कामाची पद्धत बरोबर नाही, यापुढे हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. १५ एप्रिलपर्यंत टीचर्स ट्रेनिंग ॲकॅडमीचे काम पूर्ण करा,’ अशा शब्दात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.

गेल्या सहा वर्षापासून मॉडेल कॉलनीतील महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या (एमएसबीटीई) जागेवर टीचर्स ट्रेनिंग ॲकॅडमीचे बांधकाम सुरू आहे. हे काम १ मार्च २०२० पर्यंत याचे काम पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते, पण हे काम अपूर्ण राहिले. लॉकडाऊनमध्ये काम बंद होते, पण अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उदय सामंत यांनी दोन वेळा याची पाहणी करून कामाचा आढावा घेऊन हे काम लवकरच पूर्ण होईल असे सांगितले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सामंत हे ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @पुणे’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन दिवस पुण्यात होते. शुक्रवारी (ता. १९) त्यांनी ॲकॅडमीच्या बांधकामाची पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. उच्चशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. धनराज माने, एमएसबीटीईचे सचिव डॉ. महेंद्र चितलांगे, डीटीईचे सहसंचालक डॉ. डी.व्ही.जाधव, डॉ. बी. जी. बिराजदार, डॉ. विजय कोल्हे, कंत्राटदार, आर्किटेक्ट उपस्थित यावेळी होते.

Video:चंद्रकांत पाटील पुन्हा ट्रोल; डॉ. अब्दुल कलामांविषयी दिला चुकीचा संदर्भ

हे काम अजूनही अर्धवट असल्याने सामंत यांचा पारा चढला. त्यांनी बैठकीत अधिकारी, कंत्राटदारांना फैलावर घेतले. 'कंत्राटदार काम करत नसेल तर त्याचा अधिकाऱ्यांनी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. एकाच कामाची पाहणी करण्यासाठी मंत्र्याला तीन वेळा इथे यावे लागते आहे. बांधकामामध्ये आतापर्यंत झालेला हलगर्जी आणि वेळकाढूपणा यापुढे अजिबात खपवून घेतला जाणार नाही असे खडसावले. दरम्यान, यावेळी सामंत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांवर ठेकादार, अधिकारी यांना समाधानकारक उत्तर देता आली नाही.

पुणेकरांनो खबरदारी घ्या! दुसऱ्यांदा विनामास्क आढळल्यास भरावा लागणार 1000 रुपये दंड

१५ एप्रिलपर्यंत इमारतीच्या बांधकामासह फर्निचर, स्टुडिओ, केबिन, प्रयोगशाळा याचे काम पूर्ण करा. एक मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत टीचर्स ट्रेनिंग अॅकॅडमीचे उद्घाटन होईल अशी घोषणाच सामंत बैठकीत केली.

त्यासाठी ‘एमएसबीटीई’, तंत्रशिक्षण विभाग आणि उच्चशिक्षण विभाग यांनी यासाठी समन्वयाने काम करा अशा सूचना सामंत यांनी दिल्या.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uday Samant warn to Education Officer Pune