

Ramdas Athawale
sakal
पुणे : ‘‘शिवसेनेचे मुख्य नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्यानेच विविध पक्षांतील नेते आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या पक्षातील नेते-कार्यकर्ते टिकवता आले नाहीत. त्यांनी महाविकास आघाडीची स्थापना केली नसती तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती,’’ अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी केली.