
Uddhav Thackeray
Sakal
कात्रज : शिवसेनाप्रमुख आणि श्रीकांत ठाकरे ही राम-लक्ष्मणाची जोडी होती. जिथे कमी तिथे आम्ही प्रमाणे मार्मिकसाठी श्रीकांतकाका काम करत असत. श्रीकांत ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देत उद्धव ठाकरे म्हणाले, आज या स्टुडिओद्वारे त्यांच्या स्मृतींना योग्य अभिवादन झाले आहे. सरहद ग्लोबल स्कूल ॲंड ज्युनिअर कॉलेज मध्ये संगीतकार स्वर्गीय श्रीकांत ठाकरे म्युझिक स्टुडिओचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले.