

Ujani Dam Water Storage Reaches 90 Percent but Bhima River Remains Dry Raising Irrigation and Drinking Water Concerns
sakal
नीरा नरसिंहपूर : धरण उशाला असूनही कोरड घशाला, अशी विदारक परिस्थिती सध्या इंदापूर तालुक्यातील नीरा व भीमा नदीच्या परिसरात पाहायला मिळत आहे. उजनी धरण ९० टक्के भरलेले असतानाही भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने शेतकरी व नागरिकांची चिंता वाढली आहे. नीरा नदीकाठच्या अनेक विहिरी, कूपनलिका आणि तलावांतील पाणीसाठा कमी होऊन काही जलस्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह शेती आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.